काँग्रेसनेही स्वतःसाठी अमित शहा शोधावा – मेहबुबा  मुफ्ती 

श्रीनगर – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरुअसली तरीही देशात मोदी लाट आल्याचे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. तर काँग्रेसला एका सल्लाही दिला आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी म्हंटले कि, या ऐतिहासिक जनादेशासाठी नरेंद्र मोदींचे अभिनंदन. आजचा दिवस निश्चितच भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा आहे. आता काँग्रेसनेही स्वतःसाठी अमित शहा शोधण्याची वेळ आली आहे, असा सल्ला त्यांनी दिला.

दरम्यान, मेहबुबा मुफ्ती अनंतनाग जागेवरून निवडणूक लढवत असून त्यांचा पराभव झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन जागांवर भाजप तर तीन जागांवर नॅशनल काँग्रेस आघाडीवर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.