CM meets Mahesh Gaikwad – महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना शुक्रवारी उल्हासनगर येथील हिल पोलीस स्टेशनमध्ये घडली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयातच गोळीबार केला. या घटनेचे सिसिटीव्ह फुटेज देखील उपलब्ध झाले असून आमदार गायकवाड एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे महेश गायकवाडवर गोळीबार करताना दिसत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे कल्याण शहरातील भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गळचेपी करत असल्याचा थेट आरोप केला होता.
फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या ‘ताईंना’ ‘दादा’ गटाचे खडे बोल, म्हणाले…
अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे महेश गायकवाड यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी ते आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या आरोपांबाबत काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच महेश यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली.
‘६ गोळ्या, ६ तासांचे ऑपरेशन अन् प्रकृती…’ गायकवाडांबाबत शिंदेंची मोठी अपडेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी गोळीबार प्रकरणावर भाष्य केलं. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.