Bollywood News । यंदाच्या ईदला सुपरस्टार सलमान खानने आपल्या चाहत्यांसाठी कोणताही चित्रपट आणला नसेल, तरी भाईजान पुढच्या वर्षी ईदला धमाल करणार आहे. सलमान खान 2025 सालच्या ईदच्या दिवशी एआर मुरुगादाससोबत ॲक्शन चित्रपट घेऊन येत आहे. एआर मुरुगादास साजिद नाडियादवालासोबत ‘सिकंदर’ चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीबद्दल बर्याच काळापासून नवीन नावे समोर येत होती. पण आता सलमान खानच्या सिकंदर या ॲक्शन ड्रामा चित्रपटासाठी अभिनेत्रीचे नाव फायनल करण्यात आले आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी नायिकेचे नाव लॉक करण्यात आले आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून रश्मिका मंदान्ना आहे. रिपोर्टनुसार, रश्मिका सलमानच्या चित्रपटात दिसणार आहे. रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच सुपरस्टार सलमान खानसोबत काम करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे मानले जात आहे.
रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या कथेनुसार साजिद नाडियादवाला ज्या अभिनेत्रीच्या शोधात होता, त्या अभिनेत्रीला रश्मिका फिट बसते. त्याने रश्मिकाला ही कथा सांगितली, त्यानंतर तिने चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता व्यक्त केली. या चित्रपटाची कथा आवडल्याची चर्चा आहे.
दरम्यान, 2014 मध्ये आलेल्या ‘किक’ या चित्रपटानंतर सलमान खान आणि साजिद नाडियादवाला पुन्हा एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. रश्मिकाचा मागील चित्रपट एनिमलने बॉक्स ऑफिसवर 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता आणि सर्वांच्या नजरा तिच्या आगामी चित्रपट पुष्पा 2 वरही लागल्या आहेत.
हे वाचले का ? वाणी कपूरने शेअर केला बालपणीचा ‘फोटो’