MP Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. मात्र मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी पुन्हा मतदान होणार आहे. बैतूलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडले होते. त्यावेळी मतदान झाल्यानंतर साहित्य घेऊन जाताना बसला आग लागली होती. त्यामुळे येथे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबात निवडणूक आयोगाकडून मतदानाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
चार मतदान केंद्रांवर फेरमतदान होणार
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी १० मे रोजी फेरमतदान पार पडणार आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील बूथ २७५- राजापूर, बुथ २७६- दुदर रयत, बुथ २७९- कुंदा रयत आणि बुथ २८०- चिखलीमाळ या ४ मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे.
का घेतला निर्णय? MP Lok Sabha Election 2024|
मध्य प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत बैतूलच्या चार लोकसभा जागांवर पुन्हा मतदान होणार आहे. ७ मेच्या रात्री बैतूलमध्ये मतदान कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली होती. या आगीत बससोबत काही ईव्हीएम मशीनही जळून खाक झाले होते. बैतूलच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिली होती. आता या प्रकरणी निवडणूक आयोगाने चार मतदान केंद्रांवर फेरमतदानाची अधिसूचना जारी केली आहे.
तिसऱ्या टप्प्यात किती मतदान? MP Lok Sabha Election 2024|
दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात आसामामध्ये सर्वाधिक ७५.२६ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात ६१.४४ टक्के मतदानाची नोंद झाली. बिहारमध्ये ५६.५५ टक्के, कर्नाटकमध्ये ६७.७६ टक्के, उत्तर प्रदेशात ५७.३४ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ६३.०९ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७३.९३ टक्के, छत्तीसगडमध्ये ६६.९९ टक्के, गुजरातमध्ये ५६.७६ टक्के, दादरा नगरहवेलीमध्ये ६५.२३ टक्के आणि गोव्यात ७४.२७ टक्के मतदान झाले.
तर बैतूल, भोपाळ, राजगढ, विदिशा, सागर, गुना, मुरैना, भिंड आणि ग्वाल्हेर या 9 जागांवर 66 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यापर्यंत २८० जागांवर मतदान झाल्याने लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांसाठी निवडणूक पूर्ण झाली.
हेही वाचा:
मतदान करताना भाजप नेत्याला ‘लाइव्ह’ करणे पडले महागात; पोलिसांनी केली अटक