Shrikant Shinde on Mahesh Gaikwad – भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. लोकप्रतिनिधीकडून थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयामध्ये गोळीबार घडणे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चिन्ह असल्याची टीका होत आहे.
या गोळीबारामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक व कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे काल रात्रीपासूनच हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत.
दरम्यान, जखमी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत श्रीकांत शिंदे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. महेश गायकवाड यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया सहा तास चालली, अद्यापही महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.
गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या | Shrikant Shinde on Mahesh Gaikwad
श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना, महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी सहा गोळ्या झाडल्याचा दावा केला. याबाबतचे सिसिस्टिव्ह फुटेज उपलब्ध झाले आहे. यामध्ये महेश गायकवाड यांच्यावर झालेला गोळीबार स्पष्टपणे दिसत आहे.
पोलीस याबाबत पुढील तपास करतील असेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनीही घेतली भेट । Shrikant Shinde on Mahesh Gaikwad
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज दुपारी जखमी महेश गायकवाड यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. असं असतानाही ते आज ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचले. येथे त्यांनी गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांसोबत चर्चा केल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
जमिनीच्या वादातून गोळीबार?
गायकवाड यांच्यावर झालेला गोळीबार आमदार गणपत गायकवाड यांनी जामिनीच्या वादातून केल्याची चर्चा आहे. गोळीबार केल्यानंतर स्वतः गणपत गायकवाड यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना याबाबत सांगितले आहे.