‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच; पवारांना माहिती आहे १७० आमदार कुठून येणार’

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवसेनेचाच अशी भूमिका ठामपणे सांगितली आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर सोमवारी रात्री अँजिओप्लास्टी करण्यात आली. यानंतर त्यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत यांनी म्हटले कि, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असून बहुमताचाच आकडा आमच्याकडे आहे. व ते लवकरच सिद्ध करू, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसाहेब स्वतः संजय राऊतांकडे १७० चा आकडा कुठून आला असे विचारत आहेत. यावर १७० चा आकडा कुठून येणार हे पवारांना माहित आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच लवकरच महाशिवआघाडीचे सरकार अस्तित्वात येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, याआधी नववर्षापूर्वीच राज्यात सरकार स्थापन झाले असेल, असे राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.