मुंबई – चेहऱ्यावर असुरी हास्य, डोळ्यांमध्ये काजळ, आणि घाबरवणारा अंदाज, अशा रूपातील अभिनेता सैफ अली खानचे पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे. तानाजी द अनसंग वॉरीयर या चित्रपटात सैफ अली खान मुघल सरदार उदयभानच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणने सैफ अली खानचा हा लूक सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे.
Udaybhan Ke Darbar Mein Ghalati Ki Maafi Nahi Sirf Sazah Milti Hai…#TanhajiTheUnsungWarrior, in cinemas 10th January 2020. #TanhajiTrailerOnNov19#SaifAliKhan @itsKajolD @omraut @itsBhushanKumar @ADFFilms @TSeries @TanhajiFilm pic.twitter.com/eXrqNOnbzp
— Ajay Devgn (@ajaydevgn) November 13, 2019
अजयने सैफचा फोटो ट्विट करत म्हटलय की उदयभान के दरबार में गलती की माफी नहीं, सिर्फ सजा मिलती है. सैफचा हा खलनायक स्वरूपातला अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावल्याचे दिसून येतेय. मंगळवारी अजय देवगणचा तानाजीच्या रूपातला पहिला लूक समोर आला. 19 नोव्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टर्सना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे ट्रेलरसोबतच चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पहायला मिळत आहे.
Trailer on 19 Nov 2019… New poster of #Tanhaji: The Unsung Warrior… Directed by Om Raut… 10 Jan 2020 release. #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiTrailerOnNov19 pic.twitter.com/YnoHFlWkQj
— taran adarsh (@taran_adarsh) November 12, 2019