बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट दुसरा-तिसरा कुठलाही नसून बागी 3 आहे. बागीच्या पहिल्या चित्रपटात ही जोडी दिसली होती आणि या चित्रपटाला तिकिटबारीवर चांगले यशही मिळाले होते. आता बागी 3 या सिक्वेलपटाच चित्रीकरण सुरू आहे.
यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम येथे गेलेली आहे. पण तेथील कडाक्याच्या थंडीमुळे टीमचे विशेषतः श्रद्धा कपूर आणि टायगरचे खूप हाल होत आहेत. बेलग्रेडमध्ये सध्या 11 अंश सेल्सियस पारा आहे, पण थंडी मात्र कमालीची बोचरी आहे.
या थंडीचा मुकाबला करत अभिनय करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करुन निर्मात्यांनी सेटवर हिटर बसवण्यात आले आहेत. नुकताच श्रद्धाने तेथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तसेच फोटोच्या माध्यमातून तिथे किती थंडी आहे हेही तिने मांडले आहे. सेटवर हिटर असला तरी बाहेर या कुडकुडणाऱ्या वातावरणात राहून स्वतःला फिट अँड फाईन ठेवताना दोन्ही कलाकारांचे कसब पणाला लागत आहे.