बॉलीवूडमध्ये घराणेशाहीचा कित्ता गिरवणाऱ्यांमध्ये सध्या चर्चेत असणारं एक नाव म्हणजे हर्षवर्धन कपूर. अनिल कपूरचा मुलगा आणि सोनम कपूरचा भाऊ असणारा हर्षवर्धन सध्या नेमबाज अभिनव बिंद्राच्या बायोपिकच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी मिर्जिया या चित्रपटातून हर्षवर्धनने आपल्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात केली. त्याचा दुसरा चित्रपट होता भावेश जोशी. पण तोही दणकून आपटला.
असे असले तरी हर्षवर्धन हताश झालेला नाही. हर्षवर्धन म्हणतो, माझे पिता अनिल कपूर यांनी दीर्घकाळ सिनेइंडस्ट्रीवर अक्षरशः अधिराज्य गाजवलं आहे. पण मी माझ्या मनाप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये पुढे जाणार आहे. मला अनेक अभिनव गोष्टी इथे करायच्या आहेत. यासाठी मला माझ्या विचारांनुसार वाटचाल करायची आहे. आता हर्षवर्धनचा हा स्वबळाचा नारा कितपत यशस्वी होतो हे पहायचे.