Women’s Reservation Bill : आज विशेष अधिवेशात महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी,”महिला विधेयकाला माझा पाठिंबा आहे पण मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा व्हावी, तसेत एसी, एसटी, ओबीसी महिलांना आरक्षण विधेयकात सहभागी करा,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना भाजप नेहमी महिलांचा अपमान करत असल्याचे म्हणत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “भाजप नेत्याने मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला. भाजपकडून महिलांचा सतत अपमान होत आहे,” असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला असल्याचे म्हटले.
एमके कनिमोळी द्रमुकच्या वतीने बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. यावेळी सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विरोध केला. भाजपचे लोक महिलांचाच अपमान करतात. त्यानंतर भाजपचे लोक शांत झाले, यावरुन देखील सुळेंनी भाजपवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “निशिकांत दुबे म्हणाले की इंडीया आघाडी अशा लोकांच्या बाजूने आहे जे महिलांना खाली पळवून लावतात आणि अपमानास्पद बोलतात. मात्र महाराष्ट्रात भाजपचे एक प्रमुख (चंद्रकांत पाटील) होते. त्यांनी मला वैयक्तिकरित्या टेलिव्हिजनवर रेकॉर्डवर सांगितले, सुप्रिया सुळे घरी जा, जेवण बनवा, दुसऱ्या देशात जा. हीच भाजपची मानसिकता आहे.” असा हल्लाबोल आपल्या भाषणात केला.