सारण (बिहार) – मी आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करण्यासाठी आलेले नाही, सर्व सुख मागे टाकून येथे आले आहे. मी राजकारणी नसून तुमची मुलगी आणि बहीण आहे आणि तुमच्या सुख-दु:खात तुमच्या पाठीशी उभा राहण्यास मी सदैव तयार आहे.
तुम्ही सहकार्य केलेत तर प्रत्येक जागेवर कंदीलच उजळेल, असे सांगत माजी केंद्रिय मंत्री, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी बिहारमधील सारण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी स्वत: लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव, रवी देवी आणि मिसा भारती उपस्थित होते.
रोहिणी म्हणाल्या की, आमचा उद्देश कोणाला पराभूत करणे नसून जनतेला जिंकणे हा आहे. आम्हाला १५ ऑगस्टपासून सर्वांना नोकरी द्यावी लागेल. रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व बहिणींच्या खात्यावर १ लाख रुपये आम्ही पाठवणार आहोत. मी शपथ घते की मी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहीन. डबल इंजिन सरकारमध्ये लोकांना कोणते फायदे मिळाले? गेल्या दहा वर्षात बिहारमध्ये काही गुंतवणूक आली आहे का? गेल्या दहा वर्षांत लोकांच्या सुविधांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
यासोबतच रोहिणी म्हणाल्या की, छपरामध्ये जो काही विकास झाला तो लालूजी आणि तेजस्वी यांनी केला. यावेळी, तुमच्या मुलीच्याच रुपाने मी आले आहे. या मुलीवर विश्वास ठेवा आणि पूर्ण सहकार्य करा. जिंकल्यानंतर नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही मला जिंकून दिले आणि सारण विकासाचे एक उदाहरण बनेल.
यावेळी तेजस्वी म्हणाले की, मोदींनी १५ लाख रुपये देण्याचे आणि महागाई संपवण्याचे आश्वासन दिले होते. बिहारला विशेष पॅकेज देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या दहा वर्षांत केंद्राने सारणमध्ये काय केले? भाजप म्हणजे मोठा लबाड पक्ष आहे.