मुंबई :- आशिया करंडक स्पर्धा विजेता भारतीय संघ सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला. आता याच आठवड्यात यजमान भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
भारतात येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेपूर्वी या मालिकेद्वारे दोन्ही संघांना चांगला सराव मिळणार आहे. एकीकडे भारतीय संघ आशिया करंडक जिंकून मायदेशी परतला असल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.
तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत होत ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका आपले कमकुवत दुवे विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी दूर करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
(सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजल्यापासून)पहिला सामना 22 सप्टेंबर, मोहाली
दुसरा सामना 24 सप्टेंबर, इंदूर
तिसरा सामना 27 सप्टेंबर, राजकोट
ऑस्ट्रेलिया संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.