मुंबई – ‘पोनियिन सेल्वन’ या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री तृषा कृष्णन तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तृषाने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तृषा कृष्णन व्यावसायिक जीवन चांगले आहे, परंतु तिचे वैयक्तिक जीवन काही विशेष राहिले नाही. अशात आता तृषा कृष्णन बद्दल अशी माहिती समोर येत आहे की ती वयाच्या ४० व्या वर्षी वधू होणार आहे. रिपोर्ट्सनुसार ती साऊथमधील एका निर्मात्याच्या प्रेमात असल्याचं बोललं जात आहे. तृषा लवकरच तिच्या स्वप्नातील राजकुमाराशी लग्न करणार आहे. तृषाचे चाहते तिच्या लग्नाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते अखेर चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
ती एका मल्याळम निर्मात्याच्या प्रेमात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.त्रिशा लवकरच तिच्या लग्नाबाबत मोठी घोषणा करू शकते, असे बोलले जात आहे. मात्र, अद्याप या गुड न्यूजबाबत तृषा कडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
‘पोनियान सेल्वन-2’च्या प्रमोशनदरम्यान या अतृषाने तिच्या लग्नाबाबत एक विधान केले होते, ते खूप व्हायरल झाला होते, अशी माहिती आहे. तृषा म्हणाली होती की, तिला तिचे संपूर्ण आयुष्य ती ज्याच्याशी लग्न करेल त्याच्यासोबत घालवायला आवडेल आणि तिला घटस्फोट घ्यावा लागेल असे लग्न करायचे नाही.
तृषा कृष्णनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती आगामी ‘द रोड’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘पोनियान सेल्वन’च्या दोन्ही भागांमध्ये तृषा अखेरची ऐश्वर्या रायसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता चियान विक्रमनेही मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आणि जोरदार व्यवसाय केला.