पानिपत -अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कधी पूर्ण होणार ते जाहीर करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत तरी कोण? ते मंदिराचे पुजारी आहेत की महंत, अशा प्रश्नांची सरबत्ती कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी केली.
शहा यांची गुरूवारी त्रिपुरात सभा झाली. त्यावेळी त्यांनी पुढील वर्षाच्या प्रारंभापर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असे म्हटले. 1 जानेवारी 2024 ही तारीखही त्यांनी नमूद केली. त्या तारखेनंतर चार ते पाच महिन्यांत पुढील विधानसभा निवडणूक होईल. त्यामुळे त्या निवडणुकीतील भाजपच्या प्रचारमोहिमेत राम मंदिर मुद्द्याचा समावेश असेल, असे सूचित होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर, भारत जोडो यात्रेचा भाग असणाऱ्या सभेत बोलताना खर्गे यांनी शहा यांच्यावर निशाणा साधला. राम मंदिराच्या उभारणीविषयी महंत आणि पुजाऱ्यांना बोलू द्या. तुम्ही (शहा) राजकारणी आहात. देशाला सुरक्षित ठेवणे, कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अबाधित ठेवणे, जनतेला अन्न उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे ही तुमची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
Maharashtra : महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या” अशा 56…”
मुँह में राम, बगल में छुरी असे भाजपचे धोरण आहे. तो पक्ष विभाजनाचे आणि मतपेढीचे राजकारण करतो, असे टीकास्त्रही खर्गे यांनी सोडले.