मुंबई – ‘ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण, तुम्हांला छत्रपती शिवरायांची आन, दाखवा थोडी तरी अस्मिता, थोडा तरी स्वाभिमान. आज मात्र झुकली महाराष्ट्राची मान तुडवू नका पायदळी महाराष्ट्राच्या मातीची शान .. तुम्हाला शिवरायांची आन .. ‘ असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केले आहे.
त्यांनी ट्विट करत पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला वेदांत आणि फॉक्सकॉन या कंपनीचा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, गुजरात सरकारने वेदांत आणि फॉक्सकॉन या कंपनीशी करार केला असून त्याद्वारे गुजरात राज्यात १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.