अखेर अमेठी आणि रायबरेलीचा सस्पेन्स संपला! काँग्रेसकडून राहुल गांधींना ‘या’ मतदार संघासाठी मिळाली संधी

Rahul Gandhi| यंदाही राहुल गांधी वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून अमेठी आणि रायबरेलीच्या जागेवरून काँग्रेसकडून कोण लढणार? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. मागील वेळेस अमेठीतून राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी त्यांना रायबरेलीतून निवडणुक लढण्याची संधी देण्यात आली आहे. तर अमेठीतून गांधी कुटुंबीयांचे विश्वासू के.एल. शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए श्री @RahulGandhi को उत्तर प्रदेश के रायबरेली से और श्री किशोरी लाल शर्मा को अमेठी से कांग्रेस उम्मीदवार घोषित किया गया है। pic.twitter.com/AyFIxI62XH
— Congress (@INCIndia) May 3, 2024
मागील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड आणि अमेठीमधून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा अमेठी मधून पराभूत झाले होते. आता सुद्धा ते दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. एक म्हणजे वायनाड आणि दुसरा रायबरेली यावेळी त्यांनी एक मतदार संघ बदलला आहे. राहुल गांधी हे अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. अमेठीमधून किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायबरेलीमधून सोनिया गांधी यांनी 2004 पासून 2019 पर्यंत सातत्याने खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. आता रायबरेलीमधून राहुल गांधी यांना संधी मिळाली आहे.
सोनिया गांधी राज्यसभेवर
सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा रायबरेलीच्या जागेवरून पक्ष प्रियंका गांधी यांना संधी देऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दुसरीकडे, राहुल गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवली तर पुन्हा एकदा 2019 प्रमाणे राहुल विरुद्ध स्मृती इराणी असा सामना पाहायला मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र यंदा राहुल गांधी यांचा मतदार संघ बदलण्यात आला आहे.
राहुल गांधी कधी भरणार निवडणूक अर्ज?
अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे राहुल गांधी आज दुपारीच अर्ज भरणार आहेत. प्रियांका गांधी देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. शक्तिप्रदर्शनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. राहुल गांधी आज 12.15 वाजता उमेदवारी अर्ज भरतील. सकाळी 9.20 मिनिटांनी ते विशेष विमानाने दिल्लीहून फुरसतगंजला रवाना होणार आहेत. सकाळी 11 वाजता भुएमोऊ गेस्टहाऊसवर पोहोचतील. त्यानंतर ते निवडणूक अर्ज दाखल करतील.
हेही वाचा:
‘काँग्रेसचे लोक कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कदाचित ते माझी मुलाखती ऐकल्यानंतर जायला लागतील’





