जळोची, – शरद पवारांबद्दल त्यांना बर्याच काही गोष्टी माहिती असतील तर त्यांनी पवारांची साथ सोडली नसती. दादा पलीकडे (महायुती सोबत) हे सर्वांनाच माहित आहे. आमच्यासाठी विचार व लोक महत्त्वाची आहेत आहे म्हणून आम्ही लढत आहोत.
या दोन लढती मधून तिकडून पैसा, ताकद, दबावतंत्र, मोठ्या प्रमाणात असणार आहे. इथे सामान्य नागरिक, स्वाभिमानी लोक, आणि आम्ही व शरद पवार एका बाजूने लढत आहोत. 4 जूनला कळेल. पैशाची ताकद मोठी की लोकशाहीची ताकद मोठी, असेम्हणत आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.
आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी गुरुवारी (दि. 2) बारामती दौर्यावर होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पूर्वीचे आम्हाला माहिती असणारे दादा 20,20 हजारांची सभा गाजवायचे.
मात्र आता भाजपकडे गेलेले दादा पाच पाच सहा सहा लोकांच्या बैठका घेत आहेत. आत्ता काय मोठे काय छोटे यापेक्षा भाजपने त्यांची ही परिस्थिती केली आहे. आम्ही त्यांना हेच सांगत होतो की तुम्ही मोठे नेते आहात. तुम्ही महाराष्ट्रात फिरले पाहिजे. मात्र भाजपने त्यांना लोकल नेता म्हणून बनवले आहे. त्यामुळे टेन्शन मधून येत असावेत.
पळून जाण्यापेक्षा हे लढण्याचे दिवस
आम्ही पुढच्या पिढीला संस्कार देत आहोत. अशातच आमच्यात कुटुंबात अशी वेळ आली असती की, एका व्यक्तीला मदत लागत आहे. तर आम्ही थोडीच पळून गेलो असतो. म्हणूनच पळून जाण्यापेक्षा हे लढण्याचे दिवस आहेत, असे रोहित पवार यांनी नमूद केले