पाकिस्तानात हिंदू मंदिरावर हल्ला

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. सिंध प्रांतांमधील माता रानी भातियानी मंदिरावर काही अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार नायला इनायत यांनी या घटनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वरिष्ठ पत्रकार नायला इनायत यांनी लिहिले कि, पाकिस्तानमध्ये आणखी एका मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये अज्ञात व्यक्तींनी मंदिर आणि पवित्र ग्रंथांचे नुकसान केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका स्थानिक युवतीचे अपहरण करत जबरदस्तीने तिचे धर्मपरिवर्तन करण्यात आले. तसेच यादरम्यान पाकिस्तानात असणाऱ्या नानकाना गुरूद्वारावर मुस्लिमांच्या जमावाने हल्ला चढवत जोरदार दगडफेक केली होती. याविरोधात अनेक वेळा स्थानिक अल्पसंख्याकांनी आंदोलने केली. मात्र, पाकिस्तान सरकारवर काहीच परिणाम झाला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here