priyanka- rahul Lok Sabha Election। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी अमेठी आणि रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवणार का याविषयी मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. याच चर्चांविषयी मोठी माहिती समोर आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका आणि राहुल गांधी दोघेही रायबरेली अन् अमेठीतून निवडणूक लढवणार नसल्याचे सांगण्यात येतंय.
प्राप्त माहितीनुसार, प्रियांका गांधी पक्षाचा देशभरातील प्रचार हाताळण्यावर भर देत आहेत. त्याचवेळी राहुल गांधी म्हणतात की त्यांना वायनाडमधूनच निवडणूक लढवायची आहे. काही दिवसांपासून अशी शक्यता होती की, राहुल गांधी यावेळीही अमेठीतून निवडणूक लढवू शकतात, त्याचवेळी प्रियंकाला त्यांची आई सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून तिकीट दिले जाऊ शकते.
यूपी काँग्रेसनेही हा प्रस्ताव पक्षाकडे पाठवला होता. यानंतर काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. पक्षनेतृत्वाने राहुल गांधी यांना अमेठीतून तर प्रियंका गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र दोन्ही नेत्यांनी या जागांवरून निवडणूक लढवण्यास नकार दिला.
मागच्यावेळी दोन जागांवर निवडणूक लढवली priyanka- rahul Lok Sabha Election।
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि यूपीमधील अमेठी या दोन जागांवरून लढले. तर सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून राहुल यांना स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर सोनिया रायबरेलीमधून प्रचंड मतांनी विजयी झाल्या होत्या. यावेळी सोनिया राजस्थानमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.
रॉबर्ट वाड्राचा अमेठीवर दावा priyanka- rahul Lok Sabha Election।
मात्र, प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा अमेठीच्या जागेवर दावा करत आहेत. नुकतेच ते हरिद्वारला पोहोचले होते, त्यावेळी त्यांना अमेठीतून निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, मी नेहमीच देशातील जनतेमध्ये राहिल्याने मी सक्रिय राजकारणात यावे, असा आवाज देशभरातून येत आहे. 1999 पासून मी तिथे प्रचारासाठी गेलो आहे. तिथून सोनिया गांधींना आपण विजयी आणले होते. मी त्यांच्या क्षेत्रात असावे असे लोकांना नेहमीच वाटते.