बंगळुरू : चीनमधील वुहानमधून आलेल्या कोरोना व्हायरसच्या पहिल्या संशयित रुग्णाची चाचाणी नकारात्मक आली आहे. त्यामूळे प्रशासनाची चिंता कमी झाली आहे. चीन, जपान, द. कोरीया आणि थायलंडमध्ये या विषाणूची हजारो जणांना बाधा झाली आहे.
या विषाणूचा सर्वात मोठा संसर्ग झालेल्या वुहान शहरातून ही व्यक्ती 19 जानेवारीला परतली होती. त्यांना सरकारी राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या बडक्याचे आणि रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेकडे (एनआरव्ही) पाठवण्यात आले होते. तेथे केलेल्या तपासणीत या रूग्णाला कोरोना व्हायरसची बाधा झाली नसल्याचे निष्पन्न झाले.
या व्यक्तीशिवाय बिजिंग आणि वुहान येथून आलेल्या दोन भारतीय आणि चार चिनी नागरीकांना येथील विलगता कक्षात दाखल करण्यात आले आहे. बंगळुरूतून पुण्याला असे चाचणीसाठी रक्ताचे आणि बडक्याचे एकूण 21 नमुने पाठवण्यात आले आहेत.