नवी दिल्ली ; उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरु आहे. दरम्यान, पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने प्रथापितांचा सुपडा साफ केला आहे. पंजाबमध्ये एकुण ११७ जागांपैकी आप ९०, काँग्रेस १८, अकाली दल ०६ आणि अन्य १ ठिकाणी आघाडीवर आहे.
पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांवरून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कलांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यासाठी त्यांनी ट्विट केले आहे. पंजाबमधील विजयासाठी राज्यातील जनतेचे आभार असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.
इस इंक़लाब के लिए पंजाब के लोगों को बहुत-बहुत बधाई। pic.twitter.com/BIJqv8OnGa
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2022
दिल्लीत आतापर्यंत जी आश्वासनं दिली ती अरविंद केजरीवाल यांनी पूर्ण केलं. आता तेच भगवंत मान दिल्लीत पूर्ण करतील. हा विजय आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे, असे आपचे नेते जरनेल सिंग यांनी सांगितले.
आम्ही कायमच एक पूर्ण राज्याबाबत बोलत होतो. जे आज आम्हाला मिळालं आहे. आम्ही त्या ठिकाणी आमचं प्रशासन दाखवून देऊ,” असे आपचे नेते जरनेल सिंग यांनी व्यक्त केले. तसेच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील पंजाबमधील विजयावर पंजाबच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.
पंजाबमध्ये सुरूवातीच्या निकालांमध्ये आपनं मोठी मुसंडी मारली आहे. आपच्या कार्यालयांमध्ये सध्या जल्लोष पाहायला मिळत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाब आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंतसिग मान यांचा नवा पोस्टर समोर आला आहे.