नवी दिल्ली – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. त्यातही उत्तर प्रदेशची सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीचे कल समोर आल्यानतंर पाच पैकी चार राज्यात भाजपने आपली आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा सुपडा साफ करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
त्यातच आता गोरखपूरचे आमदार आणि भाजपा नेते रवी किशन यांनी भाजपाच्या विजयाचं सेलिब्रेशन करत मिठाईचं वाटप केलं. यावेळी रवी ककिशन म्हणाले की… “मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, मंत्र्यांना तळागळापर्यंत जाऊन काम करण्याची शिकवण दिली असून त्यामुळेच हा विजय झाला आहे. ही राम राज्याची सुरुवात आहे,” असं रवी किशन म्हणाले आहेत.
Gorakhpur MP and BJP leader Ravi Kishan distributes sweets as BJP sweeps Uttar Pradesh
Modi Ji’s teaching that party workers, ministers should always work on the ground has brought us this win. This is the beginning of Ram Rajya, he says. #UttarPradeshElections2022 pic.twitter.com/cFUMKio1xu
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022