मुंबई – भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. आशिष शेलार म्हणाले, “संजय राऊत, तुमच्या मर्यादेत राहा, तुमच्या मर्यादेत बोला. आता तुम्ही चड्डी घालायला शिकलात, तुमची नाडी कधी खाली येईल ते कळणारही नाही. आपले घर दुसऱ्याच्या तुकड्यांवर चालते. तुम्ही आजपर्यंत एकही निवडणूक जिंकली नाही किंवा लढली नाही.’
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी रविवारी दावा केला होता की, शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह खरेदी करण्यासाठी 2000 कोटी रुपयांची डील करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना घोषित करून धनुष्यबाण निवडणूक चिन्ह दिले होते.
तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केले. हे आरोप करताना त्यांनी,’धनुष्यबाणसाठी तब्बल दोन हजार कोटींची डील झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या याच टीकेला आता भाजपकडून प्रतिउत्तर दिले आहे.