तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून व पॉस्को कंपनीच्या सीएसआर फंडातून वाहतूक पोलिसांना संगणक देण्यात आला. पॉस्कोचे मुख्य संचालक गुनबे किम व मिंहो जो यांच्या हस्ते संगणक प्रणाली सुपूर्द करण्यात आली.
यावेळी सचिन मरकळे, पृथ्वीराज देसाई, प्रदीप देशमुख, सचिन देशमुख, रोटरी क्लबचे सचिव श्रीशैल मेंन्थे, महेश महाजन, यादवेंद्र खळदे, दीपक शहा, विलास जाधव, जयवंत देशपांडे, दीपक गांगोळी, राजेंद्र पोळ, प्रभाकर निकम, धनंजय मथुरे, राजू गोडबोले, अतुल हंपी,
प्रसाद मुंगी, हृषिकेश कुलकर्णी, सुचित्रा कुलकर्णी, नीता देशपांडे , प्रमोद दाभाडे व वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी मनोज गुरव, लक्ष्मण मुथे, संजय रेपाळे, रमेश भोसले आदी उपस्थित होते. यावेळी पॉस्कोकडून बोलताना नेहा वाघचौडे, अमोल बुद्धखळे यांनी समाधान व्यक्त केले. रोटरीचे उपाध्यक्ष कमलेश कार्ले यांनी आभार मानले.