मुंबई – अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी चित्रपट तू झुठी में मक्कारमुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यासाठी अभिनेता जोरदार प्रमोशन करत आहे. याचदरम्यान, रणबीरला एका क्रेझी फॅनचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले. आपल्या आवडत्या स्टारला समोर पाहून बेकाबु झालेल्या या क्रेझी फॅनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कॉलेज फेस्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी हा प्रसंग घडला. फेस्टमध्ये रणबीर स्टेजवर उभे राहून परफॉर्म करत होते. त्यांच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षकांचा कडेकोट बंदोबस्त होता, पण अचानक एका चाहत्याने बाजूने उडी मारली आणि थेट स्टेजच्या मध्यभागी येऊन रणबीरला घट्ट पकडले.
हे सर्व पाहून शेजारी उभे असलेले सुरक्षा रक्षक धावले, मात्र रणबीरने सर्वांना थांबवले आणि चाहत्याला मिठी मारली. अभिनेत्याला हे करताना पाहून चाहते भलतेच खुश झाले. सोशल मीडियावर हा व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रणबीरने चाहत्याला दिलेली रिस्पेक्ट पाहून त्याचे कौतुक केले आहे.
Get yourself an idol who treats his fans like the way Ranbir Kapoor does ❤️#RanbirKapoor pic.twitter.com/zsC1CIwHav
— Ranbir Kapoor Universe (@RanbirKUniverse) February 18, 2023
तू झुठी मैं मक्कारमध्ये रणबीर कपूरसोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि आयशा रझा मिश्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तू झुठी मैं मक्कारमधून स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हा देखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.