नगर – विधानसभा सार्वत्रिक निवड़णुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी (शुक्रवारी) बारा मतदारसंघातून 202 उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले. अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात लगबग पाहायला मिळाली.
शनिवारी,दि.5 रोजी अर्जाची छाननी होणार असून सोमवारी,दि.7 दुपारी तीनपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यांनतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. माघारीसाठी तीन दिवसाचा कालावधी बाकी असल्याने ज्या मतदारसंघात बंडखोरी होणची शक्यता आहे तिथे संबंधीत पक्षाच्या प्रमुखांकडून बंडोबांना थंड करण्याचा प्रयत्न होणार हे उघड आहे.
बारा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार पुढीलप्रमाणे:
अकोले मतदारसंघातून डॉ.किरण यमाजी लहामटे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी), पिचड वैभव मधुकरराव (भाजपा), दीपक पथवे (वंचित बहुजन आघाडी) संगमनेर विधानसभा मतदारसंघात आज अखेर विजय उर्फ बाळासाहेब थोरात (भारतीय राष्ट्रीय क़ॉग्रेस), साहेबराव रामचंद्र नवले (शिवसेना),संपत मारूती कोळेकर (बहुजन मुक्ती पार्टी) यांनी अर्ज दाखल केला. शिर्डी मतदारसंघात विखे पाटील राधाकृष्ण एकनाथराव (भाजपा), सुरेश जगन्नाथ थोरात (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस) यांनी अर्ज दाखल केले.
कोपरगाव मतदारसंघात विजय सूर्यभान वहाडणे (अपक्ष), स्नेहलता बिपीन कोल्हे (भारतीय जनता पार्टीं), राजेश नामदेवराव परजणे (अपक्ष), अशोक विजय गायकवाड (बहुजन वंचित आघाडी), आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, ), यांनी अर्ज सादर केले.
श्रीरामपूर मतदारसंघात डॉ. चेतन सदाशिव लोखंडे (अपक्ष-शिवसेना), रामचंद्र नामदेव जाधव (अपक्ष), भाऊसाहेब मल्हारी कांबळे- (शिवसेना), कानडे लहू नाथा- भारतीय राष्ट्रीय कॉंगेस, यांनी अर्ज दाखल केले. नेवासा मतदारसंघात शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी), सुनीता शंकरराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी आणि अपक्ष), बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे (भाजपा), यांनी अर्ज सादर केले.
शेवगाव मतदारसंघातून आजअखेरपर्यंत मोनिका राजीव राजळे (भारतीय जनता पार्टी), हर्षदा विद्याधर काकडे (अपक्ष आणि भाजप), किसन जगन्नाथ चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), अमोल गर्जे (अपक्ष आणि भाजप), प्रतापराव बबनराव ढाकणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष), प्रभावती माधवराव ढाकणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष) यांनी अर्ज दाखल केले. राहुरी मतदारसंघातुन कडिर्ले शिवाजी भानुदास (भाजपा), तनपुरे रावसाहेब राघुजी (अपक्ष), तनपुरे प्राजक्त प्रसाद (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष), यांनी अर्ज दाखल केले. पारनेर मतदारसंघात नीलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), औटी विजयराव भास्करराव (शिवसेना), संदेश तुकाराम कार्ले (अपक्ष), वसंत फुलाजी चेडे (अपक्ष), सुजीत वसंतराव पाटील (अपक्ष) यांनी अर्ज सादर केले.
नगर शहर मतदारसंघात , अनिल रामकिसन राठोड (शिवसेना), संग्राम अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) यांनी अर्ज दाखल केले. श्रीगोंदा मतदारसंघात पाचपुते बबनराव भिकाजी (भाजप), पाचपुते प्रतिभा बबन (भाजप), अनुराधा राजेंद्र नागवडे (अपक्ष), घनशाम प्रतापराव शेलार (एनसीपी), अर्ज दाखल केला. कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित राजेंद्र पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) राम शंकर शिंदे (भाजपा), अरुण हौसराव जाधव (बहुजन समाज पार्टी), यांनी अर्ज दाखल केले. सोमवारी यातील बहुतेक जणांचे अर्ज राहणार आहेत.