पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (दि.२९) सायंकाळी लष्कर भागातील रेसकोर्स मैदानावर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर या भागात होणारी गर्दी विचारात घेता दुपारनंतर परिसरातील काही रस्ते बंद ठेवण्यात आले असून काही रस्त्यावर वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
रेसकोर्स परिसरामधील पाणी टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतुक करण्यात येत आहे. तर, टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक, रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात येत आहे. सोलापुर रोडवरील अर्जुन रोड जं. ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद करण्यात येत आहे.
बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील. या मार्गावरील वाहनधारकांसाठी मम्मादेवी जंक्शन येथुन व बेऊर रोड जंक्शन येथुन इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तात्पूरत्या स्वरुपात बंद राहणार्या रस्त्यांमध्ये गोळीबार मैदान ते भैरोबानाला (सोलापुर रोड) याचा समावेश असून लुल्लानगर येथून पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौक (सोलापुर रोड) यासाठी भैरोबानाला ते लुल्लानगर हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. मोरओढा ते मैरोबानाला (एंम्प्रेसगार्डन रोड) या मार्गावरील वाहनधारकांना मोरओढा घोरपडी रेल्वेगेट – बी.टी. कवडे रोडने इच्छितस्थळी तर, वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी मार्गे बी. टी. कवडे रोडने इच्छित स्थळी जाता येईल.
भैरोबानाला ते मोरओढा या मार्गासाठी पर्यायी मार्ग बी.टी. कवडे जंक्शन ते बी.टी. कवडे रोडने उड्डाणपुलावरुन इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच, मोर ओढा ते मम्मादेवी (काहुन रोड जंक्शन बेऊर रोड मार्गे) मार्गावरील वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग मोरओढा सदन कमांड कॉन्सिल हॉल ब्लु नाईल मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.
गोळीबार मैदान, मम्मादेवी चौक, भैरोबानाला चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक कॅम्प, कोरेगाव पार्क जंक्श ताडीगुत्ता चौक, नोबल हॉस्पीटल वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी (दि.२९) रोजी दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत वरील परिसरामधुन जाण्यासाठी वाहनधारकांनी बाहेरील रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.