नगर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोतवाली, जामखेड व श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सुुरु असणाऱ्या अवैध दारु विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध धडक कारवाई करून, 1 लाख 57 हजार 141 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एकूण 7 जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यात रंगोली हॉटेल येथे छापा टाकून देशी-विदेशी 6 हजार 511 रुपयांची दारू जप्त केली. यात विष्णू सखाराम इंगळे (वय-40, रा. वारंगा, ता. कळमनूर, जि. हिंगोली, ह.रा. रंगोली हॉटेल, ता.जामखेड) व दुसऱ्या ठिकाणी छापा टाकून 1 हजार 646 रुपयांची विदेशी दारु जप्त केली. यात महेश माणिक काळे (वय- 42, रा.खडकवाडी,ता.जामखेड). कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत एक बुलेट (एमएच 16 बीएल-9100) व देशी-विदेशी दारु असा 83 हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त यात अविनाश रघुनाथ खाकाळ (वय-38, रा.अंभोरा, ता. आष्टी जि.बीज) यांच्या गुन्हा दाखल केला आहे. श्रीगोंद्यात तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले.
यात गावठी दारु व कच्चे रसायन 15 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त, राजू बथुऱ्या काळे (वय 45 रा. शिपलकर वाडी), गावठी दारु, कच्चे रसायन व हातभट्टी साधणे असा 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, यात आवडाबाई जातमहाल भोसले (रा.शिपलकरवाडी) या महिलेवर गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. तर 12 हजार रुपयांचा गावठी दारु, कच्चे रसायन व हातभट्टीची साधणे असा मुद्देमाल जप्त केला असूून, बजरंग ढालाजी गिर्हे (रा.शिरसगाव बोडखा) आदींवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधु, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक मोहिम राबवून ही कारवाई केली आहे.