मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून राज्यातील ड्रग्स प्रकरणावरून नवनवीन आरोप आणि खुलासे करत असल्याचे दिसत आहेत. त्यातच त्यांनी आज आणखी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या आजच्या ट्विटची सोशल मीडियावर एकच चर्चा असून यातून त्यांनी आणखी एक सूचक इशारा दिला असल्याचे म्हटले जात आहे.
नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटमधून त्यांचा नेमका कोणाकडे इशारा आहे हे लक्षात आले नाही. तरीपण आता मलिक यांच्याकडून कुणावर हल्लाबोल होणार, कुणाला लक्ष्य केले जाणार याकडे अनेकांच्या नजरा आहेत. आजच्या ट्विटमध्ये त्यांनी, बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे, असे शायरीच्या माध्यमातून इशारा दिला आहे.
बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी
लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
याआधी नवाब मलिक यांनी अशाच प्रकारे आधी ट्वीट करत इशारा देऊन नंतर आणखी काही ट्विट्स किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोपांची राळ उठवून दिली होती. त्यामुळे आज ते कुणावर काय आरोप करतात याकडे अनेकांचं लक्ष आहे.
नवाब मलिक यांनी हे ट्वीट केल्यानंतर काही वेळातच यावर प्रतिक्रियांचा पाऊस आलाय. तसेच अनेकजण हे ट्वीट लाईक आणि रिट्वीट देखील करत आहे. या ट्वीटवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये जशा नवाब मलिक यांच्या कौतिकाच्या प्रतिक्रिया आहेत तशाच त्यांच्यावर टीका करणाऱ्या देखील आहेत.
दरम्यान, नवाब मलिक यांनी आपल्या आधीच्या पत्रकार परिषदांमध्ये बोलताना भाजपच्या अनेक नेत्यांचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचा इशारा दिलाय. यात त्यांनी प्रतिक गाबापासून अनेकांचा उल्लेख केलाय. तसेच आगामी विधानसभा अधिवेशनात सदनाच्या पटलावर या सर्वांवरील आरोपांबाबतचे पुरावे ठेवणार असल्याचे म्हटले आहे.