देशभरात दिवाळी मोठ्या धामधुमीत सुरू झाली आहे. बाजारपेठांमध्ये वर्दळ वाढली आहे. दुसरीकडे, सणासुदीचा हंगाम सुरू होताच देशात करोनाच्या प्रकरणांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यातून करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या बातम्या येत असल्याने या सणासुदीच्या काळात सर्व लोकांना करोनाविरूद्ध विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, कोरोना महामारीची तिसरी लाट अजूनही चिंतेची बाब आहे, त्यामुळे आरोग्य किंवा सुरक्षिततेशी तडजोड न करता दिवाळी साजरी करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, सणासुदीच्या काळात जराही दुर्लक्ष झाले तर करोना पुन्हा एकदा उग्र रूप धारण करू शकतो. अशा परिस्थितीत करोनापासून बचाव करताना कोणते उपाय करून दिवाळीचा सण साजरा केला जाऊ शकतो हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
० सामाजिक अंतराची काळजी घ्या
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवाळीची खरेदी असो किंवा सण साजरा असो, प्रत्येकाने नेहमीच सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली पाहिजे. दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये गर्दी असते, अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळल्यास करोनापासून सुरक्षित राहू शकतो. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी एकमेकांपासून किमान 1 मीटर अंतर ठेवा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
० मास्क आवर्जून वापरा
कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे ही सर्वात महत्त्वाची खबरदारी आहे. हे केवळ तुम्हाला करोनापासून सुरक्षित ठेवणार नाही तर फटाक्यांमधून निघणाऱ्या धुराचा धोका कमी करण्यासही मदत करेल. बाजारात जाताना किंवा दिवाळी साजरी करताना नेहमी मास्क घाला.
० हाताच्या स्वच्छतेची काळजी घ्या
करोनाच्या या काळात सुरक्षित दिवाळी साजरी करण्यासाठी ‘ही’ काळजी नक्की घ्या !या सणासुदीच्या काळात हाताच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरने हात चांगले धुवा, विशेषत: बाजारात वस्तू खरेदी केल्यानंतर किंवा लोकांना भेटल्यानंतर. एक गोष्ट लक्षात ठेवा की सॅनिटायझर हे अत्यंत ज्वलनशील असतात, त्यामुळे मेणबत्ती किंवा दिवा लावण्यापूर्वी सॅनिटायझर लावू नका.
० लसीकरण करा
करोनाच्या या काळात सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दिवाळीच्या काळात गर्दी वाढते, त्यामुळे त्यापूर्वी लसीकरण करून घ्या. लसीकरण तुम्हाला COVID-19 च्या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांनीही दिवाळीत करोना टाळण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे.