मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईच्या विशेष न्यायालयाने (PMLA) 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.दरम्यान, यावेळी न्यायालयाने देशमुखांना चांगलेच खडेबोल सुनावले. देशमुखांनी तुरुंगात घरचं जेवण मिळावं, यासाठी देशमुखांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पण बेड आणि औषधं पुरवण्याचे निर्देश दिलेत.
पुढील काही दिवस तुरुंगातील जेवण घ्या, योग्य वाटलं नाही तर विचार करु, असे न्यायालयाने सांगितले. अनिल देशमुख यांनी घरचे जेवण मिळावे यासाठी अर्ज केला होता. मात्र, या अर्जावरील सुनावणी काही दिवसांनंतर होणार आहे. तोपर्यंत राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना इतर कैद्याप्रमाणे तुरुंगातील जेवण घ्यावे लागणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल मुंबई विशेषन्यायालयात हजर करण्यात आले होते. देशमुखांना न्यायालयाने दोन आठवड्याची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान अनिल देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देत घरच्या जेवणाची मागणी केली होती. न्यायालयाने देशमुखांची ही मागणी फेटाळली. यावेळी न्यायालयाने आधी तुरुंगातील जेवण खायला सांगत देशमुखांना फटकारले. आधी तुरुंगातील जेवण खा, ते योग्य नसल्यास विचार करू, अस कोर्टांनी सुवाणीदरम्यान सांगितलं.
मात्र, न्यायालयाने देशमुखांना तुरुंगात स्वतंत्र बेड ठेवण्याची परवानगी दिली आहे. यासाठीही त्यांनी प्रकृतीचं कारण दिले होते. अनिल देशमुख यांना तुरुंगातील जेवणामुळे काही समस्या उद्भवल्यास घरच्या जेवणासाठी अर्ज करावा, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आता पुढील काही दिवस माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना इतर कैद्यासोबत तुरुंगातील जेवण खावं लागणार आहे.
अनिल देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी ईडीकडून युक्तीवाद केला.