निस्वार्थी सेवेबद्दल खुश होऊन श्रीमंत महिलेने दिले बक्षीस
नवी दिल्ली : कटक माणसाने केलेल्या चांगल्या कामाचे चीज होते असे मानले जाते. त्याचा अनुभव ओरिसामधील एका सामान्य रिक्षाचालकाला आला आहे. एका श्रीमंत महिलेची गेली कित्येक वर्षे निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या या रिक्षाचालकाला त्या महिलेने आपली संपुर्ण संपत्ती दिली आहे. हा सामान्य रिक्षाचालक आता कोट्याधीश झाला आहे.
बुद्धा सामल असे या रिक्षाचालकाचे नाव असून कटक शहरातील एका श्रीमंत पण निराधार वृद्धेची आणि तग कुटुंबाची त्याने गेली कित्तेक वर्ष सेवा केली होती. त्याचे फळ त्याला या पद्धतीने मिळाले आहे. मिनाती पटनायक असे या 63 वर्षे महिलेचे नाव असून तिने आपली तीन मजली इमारत आणि सोने-चांदीचे दागिने या रिक्षाचालकाचा नावे केले आहेत.
मिनाती पटनाईक यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या एकट्या पडल्या. अशावेळी बुद्धा सामाल त्याने त्यांची निस्वार्थ बुद्धीने आणि प्रामाणिकपणे सेवा केली मीनाती पटनाईक यांना एक मुलगी होती. तिने आपल्या आईची सेवा करण्यासाठी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण सहा महिन्यापूर्वी तिचे ही एका आजारामुळे निधन झाल्यानंतर मिनाती पटनाईक पुन्हा एकट्या पडलेल्या या काळातही बुद्धा यांनी त्यांची सेवा केली पती आणि मुलीच्या निधनानंतर मिनाती पटनायक एकदम खचून गेल्या होत्या.
आपल्याला कोणाचा सहारा नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती, पण बुद्धाने ती त्यांच्या मनातील भावना पुसून काढून त्यांची सर्व प्रकारे सेवा केली. बुद्धा अनेक वर्षे या कुटुंबाशी संबंधित होते. कोमलला लहानपणी शाळेत सोडणे आणण्याचे काम तेच करत होते. या शिवाय इतर दैनंदिन कामही ते करत होते. त्यामुळे मिनाती पटनाईक यांच्या पतीचा आणि मुलीच्या निधनानंतरही त्यांनी या कुटुंबाची साथ सोडली नाही आणि त्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेचे अखेर त्यांना अशाप्रकारे फळ मिळाले.