Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीनंतर देशातील बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेससोबत जातील, असे भाकित शरद पवार यांनी व्यक्त केल्यानंतर देशात पुन्हा एकदा विलीनीकरण या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची अर्धी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे भाकित केले होते. यावरून राजकारण तापले असून राजकीय नेते प्रतिक्रिया देतांना दिसत आहे.
यावरच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुबार येथे सभेला संबोधतांना शरद पवार यांना मोदी ऑफर दिली आहे. मोदी म्हणाले,’बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. नकली शिवसेना, NCP ने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन बनवलय’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली असली, तरी त्यांना एक ऑफर सुद्धा दिली आहे. ते म्हणाले,’शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील.’ असेही मोदी म्हणाले आहे.
हे वाचल का ? डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आला समोर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले