महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना येथील विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला.यावर आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली की,’अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याबद्दल न्यायालयाचे आभार!’ असेही त्यांनी लिहिले आहे.
रोहित पवार यांचे ट्विट
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याबद्दल न्यायालयाचे आभार! परंतु काही आरोपी यातून निर्दोष सुटल्याने त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यास सरकारला अपयश आलं, याचं दुःख होतं.… pic.twitter.com/VwKJ3N2RBr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 10, 2024
हे वाचले का ? PM मोदींच्या ऑफरवर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया…