Lok Sabha Election 2024 गोरखपूर लोकसभा मतदारसंघात नामांकन करण्यापूर्वी, महायोगी गुरु गोरखनाथ मंदिरात पोहोचल्यानंतर, भाजप खासदार उमेदवार रविकिशन शुक्ला यांनी त्यांच्या कुटुंबासह महायोगी गुरु गोरखनाथ मंदिर परिसरात असलेल्या शिव मंदिरात पूर्ण विधीसह रुद्राभिषेक केला.
रुद्राभिषेकानंतर खासदार उमेदवार रविकिशन शुक्ला यांनी गोरख पीठाधीश्वर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी रविकिशन यांनी राहुल गांधी आणि यादव हे राजपुत्र निवडणुकीनंतर इटली आणि ऑस्ट्रेलियाला जातील. असे विधान केले आहे.
नेमकं काय रविकिशन शुक्ला
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्गाचे आणि प्रत्येक समाजाचे कल्याण केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे बिमारू राज्यातून उत्तम राज्यात रूपांतर केले. संपूर्ण राज्यातून डास माफिया गायब झाले. गोरखपूरमध्ये चित्रपटांचे शूटिंग सुरू झाले. केंद्र आणि राज्य सरकारने अगणित कामे केली आहेत. गोरखपूर संपूर्ण भारतात एक आदर्श निर्माण करत आहे.’ अस म्हणत त्यांनी भाजपने विकास कामे केली असल्याचे सांगितले.
रवी किशन पुढे म्हणाले ,’आजचा दिवस अतिशय शुभ आहे आणि ऐतिहासिक विजयानंतर 4 जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाला ऐतिहासिक देश बनवण्याचे काम करतील. अनेक ऐतिहासिक निर्णय होतील, जे देशाच्या हिताचे असतील. विकसित भारताच्या स्थानासाठी देश वेगाने धावू लागेल. दोन्ही राजकुमार खेळ खेळून निघून जातील. एक इटलीला जाईल आणि दुसरा ऑस्ट्रेलियाला जाईल.’ असं म्हणत रवि किशन यांनी टीका केली आहे.