Team India, T20 WC 2024 : आयपीएल 2024 स्पर्धा संपल्यानंतर म्हणजेच येत्या 1 जूनपासून T20 विश्वचषक 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सर्व संघ हळूहळू सज्ज होत आहेत. टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ते चांगली कामगिरी करत आहेत. भारताचे असे तीन फलंदाज आहेत जे टी-20 विश्वचषकात प्रतिस्पर्धी संघांना घातक ठरू शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना होणार आहे. या सामन्यासाठी शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
संजू सॅमसन, शिवम दुबे आणि विराट कोहली टी-20 विश्वचषकात धमाकेदार फलंदाजी करू शकतात. संजूने आयपीएल 2024 मध्ये 11 सामने खेळले आहेत. या कालावधीत 417 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 5 अर्धशतके झळकावली आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू शिवम दुबे फॉर्मात आहे. त्याने 11 सामन्यात 350 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत.
शिवम टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करू शकतो. तो फॉर्मात आहे. शिवम दुबेही फिनिशरची भूमिका साकारू शकतो.
विराट कोहली स्फोटक फलंदाजी करण्यात माहीर आहे. आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर आहे.
कोहलीने IPL 2024 च्या 12 सामन्यांमध्ये 634 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके केली आहेत.