Asaduddin Owaisi on Navneet Rana । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ मे रोजी पार पडणार आहे. दरम्यान, या चौथ्या टप्प्यात हैद्राबादमध्येही मतदान होणार आहे. त्यामुळे याठिकाणचा प्रचार शिगेला पोहचला आहे. दरम्यान, अमरावतीतील भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी हैद्राबादमध्ये केलेल्या त्यांच्या ’15 सेकंद’ विधानावर आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार पलटवार केला आहे.
नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना ओवेसी यांनी, “मोहतरमा (नवनीत राणा) छोटे (अकबरुद्दीन) यांना खूप समजावून सांगून ठेवले आहे, त्यांना सोडू का? आणि जर मी छोट्या भावाला सांगितलं तर तुमचं काही खरं नाही कारण तो माझ्याशिवाय कोणाचेही ऐकणार नाही. २ दिवस बाकी आहेत, सांगू का त्याला? असा धमकीवजा सवाल करत राणांना उत्तर दिलं आहे.
मी छोट्या भावाला थांबवून ठेवलंय Asaduddin Owaisi on Navneet Rana ।
पुढं ओवेसी यांनी, “महाराष्ट्रातून येणारा खासदार छोटे-छोटे असं म्हणतात. अहो, मी छोट्या भावाला थांबवून ठेवलंय. तुम्हाला माहीत आहे का कोण आहे छोटा ? तोफ, सालारचा मुलगा आहे छोटे. त्याला मोठ्या कष्टाने त्याला समजावून सांगावे लागते. छोटा कोणाचेही ऐकत नाही. मी काय कोंबडीच पिल्लू आहे का ? 15 सेकंद हवे आहेत” असं म्हणताय.
“15 सेकंद नाही 1 तास घ्या” Asaduddin Owaisi on Navneet Rana ।
याआधी ओवेसी म्हणाले होते की, मी मोदीजींना 15 सेकंद नाही तर 1 तास द्या असे सांगत आहे. आम्ही घाबरत नाही, तुमच्यात किती माणुसकी उरली आहे हेही बघायचे आहे. तुम्ही जास्तीत जास्त अखलाक किंवा मुख्तार अन्सारीबरोबर जे घडलं ते आमच्याबरोबर कराल. तुमच्यात किती माणुसकी शिल्लक आहे, ते मला बघायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुम्हाला घाबरू, मात्र तुमचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पंतप्रधान तुमचा, प्रशासन तुमचं, तुम्हाला कोणी अडवलंय? कुठं यायचं ते आम्हाला सांगा…आम्ही येऊ” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, नवनीत राणा म्हणाल्या कि, “१५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, मग ओवेसी बंधू कुठून आले आणि कुठे गेले हे कळणार नाही.” असं म्हणाल्या होत्या. त्यावर आता असदुद्दीन ओवेसी यांनी पलटवार केलाय.