पुणे – देशातील सर्वच घटकांना करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बसू लागला असला, तरी सर्वाधिक दयनीय अवस्था झाली आहे. हातावर पोट असलेल्या या लोकांवर करोनामुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली दिसत आहे. राज्यात 23 हजारांहून अधिक भिकारी असल्याची शासनाची अधिकृत आकडेवारी आहे. प्रत्यक्षात ती त्याहून कितीतरी अधिक आहे. या भिकाऱ्यांची भीक मागण्याची मुख्य ठिकाणे म्हणजे धार्मिक आणि सार्वजनिक स्थळे. मात्र, मंदिरे बंद केल्याने भिक्षेऱ्यांना अन्नदेखील मिळणे मुश्किल झाले आहे. काही ठिकाणी पोलीस कर्मचारी या भिक्षेकऱ्यांना जेवण उपलब्ध करून देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.