बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेटची मुलगी समीषा आज 40 दिवसांची झाली आहे. मुलीच्या 40व्या दिवशी शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती पती राज कुंद्रा आणि मुलगा विहानसमवेत समीषाला आपल्या कुशीत घेतलेले आहे. यापूर्वीच्या दोन्ही फोटोंप्रमाणेच या फोटोमध्ये समीषाचा चेहरा दिसत नाही.
शिल्पाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आजचा दिवस समीषासाठी खूप खास आहे. परंतु करोना विषाणूमुळे तिला बाहेर घेवून जावू शकत नाही. मुलीचा फोटो शेअर करत शिल्पा म्हणाली, आज समीषाला 40 दिवस झाले आहेत. हिंदूप्रथा नुसार आजचा दिवस आई आणि मुलासाठी खूप खास असतो. प्रथेनुसार, आम्हाला प्रथमच समिषाला आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जायचे होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत हे शक्य नाही.
म्हणूनच आम्ही आमच्या घराच्या मंदिरात देवाचे आशीर्वाद घेतले. दरम्यान, शिल्पा शेट्टी सेरोगेसीच्या माध्यमातून दुसऱ्यांदा आई झाली आहेत. 15 फेब्रुवारीला तिने समिषाला जन्म दिला होता. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी तिने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. शिल्पाने आतापर्यंत तिच्या इंस्टाग्रामवर समिषाचे तीन फोटो पोस्ट केले आहेत, पण तिचा चेहरा कोणत्याही फोटोंमध्ये दिसला नाही. यापूर्वी शिल्पाने शेअर केलेल्या दोन फोटोंमध्ये समिषाचे फक्त हातच दिसले आहेत.