अक्षय कुमारने “अतरंगी रे’साठी घेतले कोट्यवधीचं मानधन
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. जो शूटिंगसाठी भरमसाट मानधन घेण्यासाठी ओळखला जातो.
2019मध्ये एका पाठोपाठ एक हिट सिनेमा केल्यानंतर यावर्षी
देखील त्याचे अनेक प्रोजेक्ट्स लाइन अप आहेत. “अतरंगी रे’मध्ये देखील अक्षय कुमार एकदा पुन्हा जबरदस्त अभिनय करताना दिसणार आहे.
यामध्ये त्याच्याबरोबर सारा अली खान आणि दाक्षिणात्य स्टार धनुष स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांबरोबरही अक्षय पहिल्यांदा काम करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहेत. दरम्यान अशी बातमी मिळत आहे की, या चित्रपटाच्या 2 आठवड्यांच्या शेड्यूलसाठी अक्षय कुमारने त्याच्या आधीच्या मानधनापेक्षा जवळपास दुप्पट मानधन घेतले आहे.
या चित्रपटामध्ये अक्षय कुमार एका स्पेशल भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तानुसार अभिनेत्याने 2 आठवड्यांच्या शेड्यूलसाठी 27 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. अक्षय कुमार 9 हा आकडा त्याचा लकी नंबर मानतो. त्यामुळे तो नेहमी मानधन घेताना 9 आकड्याशी जुळणाऱ्या संख्येचं तो मानधत घेतो.
दरम्यान, खिलाडीकुमार एका वर्षामध्ये जवळपास 3 ते 4 चित्रपट घेऊन येतोच. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील कमालीचे हिट ठरतात. अक्षय कुमार लवकरच “सूर्यवंशी’, “लक्ष्मी बम’, “बेलबॉटम’, “बच्चन पांडे’ आणि “पृथ्वीराज’ या सिनेमामध्ये दिसणार आहे.