Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru, Score Update : आज आयपीएल 2024 च्या 58 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा आहे. वास्तविक, आज जो संघ पराभूत होईल तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. अशा स्थितीत दोन्ही संघ विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जसमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 7 बाद 241 धावा केल्या आहेत.
Our 4th highest total in the IPL and the highest total for any team at the Dharamshala in the IPL. 🔥
12th Man Army, how do you think we have done so far? 🙌#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #PBKSvRCB pic.twitter.com/fRcBu4s8xT
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 9, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विराट कोहलीने 47 चेंडूत सर्वाधिक 92 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 6 षटकार मारले. याशिवाय रजत पाटीदारने 23 चेंडूत 55 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याचवेळी कॅमेरून ग्रीनने शेवटच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन सादर केले. कॅमेरून ग्रीनने 27 चेंडूत 46 धावा केल्या. या अष्टपैलू खेळाडूने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर 7 चेंडूत 18 धावा करून दिनेश कार्तिक पॅव्हेलियनमध्ये परतला.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात खराब झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर फाफ डू प्लेसिसने 7 चेंडूत 9 धावा करून माघारी परतला. यानंतर विल जॅक 7 चेंडूत 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दोन फलंदाज 43 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्यात 76 धावांची चांगली भागीदारी झाल्यानं संघाला मोठी धावसंख्या उभारता आली.
पंजाब किंग्जच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हर्षल पटेलने 4 षटकांत 38 धावांत 3 फलंदाज बाद केले. विदवथा कावरप्पा याला 2 यश मिळाले. याशिवाय अर्शदीप सिंगने विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली. तर कर्णधार सॅम करनने रजत पाटीदारला बाद केलं. सॅम करनने 3 षटकात सर्वाधिक 50 तर त्यापाठोपाठ राहुल चहरने एकही विकेट न घेता 3 षटकात 47 धावा दिल्या. अर्शदीपने 3 षटकात 41 धावा दिल्या.