Saudi Smash 2024 (Saudi Arabia) :– जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानी असलेल्या नीना मित्तेलहॅमचा पराभव करून सौदी स्मॅश टेबल-टेनिस लीग या एलिट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडू ठरली आहे.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वांग मन्यूचा दुसऱ्या फेरीत पराभव केल्यानंतर बात्राने 22 मिनिटांत जर्मनीच्या नीना मिटेलहॅमचा 11-6, 11-9, 11-7 असा पराभव केला. मनिकाचा या प्रतिस्पर्ध्यावर चार प्रयत्नांत पहिला विजय ठरला.
Saudi Smash 2024 : सौदी स्मॅश स्पर्धेत भारताच्या ‘मनिका बत्रा’ने केला मोठा उलटफेर…
आता तिचा सामना जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकाची जपानची हिना हयाता हिच्याशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत सध्या 39व्या क्रमांकावर असलेली मनिका या कामगिरीनंतर अव्वल 25 मध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.