आमिर खानने दुसरी पत्नी किरण रावला घटस्फोट दिल्याच्या घटनेला आता 6 महिने होऊन गेले असावेत. तेव्हापासूनच आमिर आणि फातिमा सना शेख यांच्यातील कथित रिलेशनशिपबाबत चर्चा व्हायला लागली होती.
आता आमिर आणि फातिमा यांनी निकाह केला असल्याची एक बातमी पसरायला लागली आहे. या दोघांचा विवाहाच्या पोशाखातला एक फोटो व्हायरल व्हायला लागला आहे. त्यावरूनच ही चर्चा रंगायला लागली आहे. हा फोटो फेसबुकवर पोस्ट झाला आहे.
“दंगल’मध्ये आमिर खानच्या मुलीचा रोल करणाऱ्या फातिमाचा आमिरबरोबर तिसरा निकाह झाल्याचे या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. आमिर खान “सत्यमेव जयते’मधून महिलांच्या समस्या मांडतो. मग त्याच्या या कृतीला काय म्हणाल, असा सवाल फोटो पोस्ट करणाऱ्याने विचारला आहे.
आमिर आणि फातिमाकडून अद्याप तरी निकाह करण्याची कोणतीही घोषणा केली गेलेली नाही. “लालसिंग चढ्ढा’ रिलीज झाल्यानंतर कदाचित त्याबद्दल काहीतरी घोषणा केली जाऊ शकते. खरी गोष्ट अशी आहे की, ज्या फोटोवरून ही चर्चा सुरू झाली तो मूळचा फोटो किरण रावबरोबरचा आहे आणि किरण रावच्या चेहऱ्याच्या जागेवर फातिमाचा चेहरा लावला गेला आहे.