Gurucharan Singh । Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही शोचे अभिनेते गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या 5 दिवसांपासून अभिनेत्याचा पत्ता नाही. त्याचे कुटुंब चिंतेत आहे.
प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, आपल्या मजेशीर शैलीने सगळ्यांना हसवणारा आणि नेहमी आनंदी राहण्याचा सकारात्मक संदेश देणारा ‘रोशन सिंग सोधी’ कुठे गेला?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंह 22 एप्रिलला मुंबईला रवाना होणार होते. रात्री 8.30 वाजता ते दिल्ली विमानतळावर पोहोचले, पण त्यांनी प्रवास केला नाही. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिनेता आपली बॅग घेऊन रस्त्यावरून चालताना दिसत आहे.
दरम्यान गुरुचरण सिंह गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे कुटूंबियांच्या मनात कुठे जात होता, त्याचे फ्लाइट का चुकले, त्याचे कोणीतरी खरोखरच अपहरण केले आहे का, असे प्रश्न येत आहे.
मात्र, अश्यातच एक मोठी माहिती समोर आली असून गुरूचरण सिंगने दिल्लीच्या एका एटीएमवरून सात हजार रूपये काढल्याचे देखील पोलिस तपासात उघड झालंय. पोलिसांच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार गुरूचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात होता.
हेच नाही त्याचे लग्न देखील काही दिवसांवर होते आणि दुसरीकडे तो रूग्णालयात उपचार घेऊन घरी आराम करत होता. हे तर स्पष्ट आहे की, गुरूचरण सिंग हा मुंबईकडे न जाता दिल्लीमध्येच होता. दिल्लीच्या पालम परिसरातील अनेक सीसीटीव्हीमध्ये तो दिसत आहे.
गुरूचरण सिंगचे अपहरण केल्याचा अंदाज लावला जातोय. अजूनही पोलिस या प्रकरणात तपास करताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याचा अंदाज आहे.
गुरूचरण सिंग याने 2020 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली होती.गुरूचरण सिंगची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ते सतत आपल्या मीडिया अकाउंटवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात.