नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मोदी पंजाबात गेले होते त्यावेळी त्यांनी मला दहशतवादी ठरवले होते. त्यासाठी त्यांनी चौकशीही गठित केली होती. पण त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.
आज गुजरात व दिल्ली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मला भ्रष्टाचारी म्हणत आहेत. जर मी दहशतवादी, भ्रष्टाचारी आहे तर मला अटक करा ना ! असे आव्हान त्यांनी दिले.
पंजाब के पहले PM बोले – केजरीवाल आतंकवादी है। HM ने जाँच बिठा दी। क्या हुआ उसका?
अब गुजरात/MCD के पहले कह रहे हैं केजरीवाल भ्रष्ट है
अरे, केजरीवाल आतंकवादी या भ्रष्ट है तो गिरफ़्तार करो ना?
केजरीवाल ना आतंकवादी है ना भ्रष्ट।केजरीवाल जनता का लाड़ला है। इस से बीजेपी को तकलीफ़ है
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 8, 2022
ते म्हणाले की, केजरीवाल ना दहशतवादी आहे, ना भ्रष्टाचारी आहे. थेट मोदींना उद्देशून ट्विट करण्याची त्यांची अलीकडच्या काळातील ही पहिली वेळ आहे. गुजरातच्या निवडणूक प्रचारातही ते थेट मोदींना उद्देशून टीका करणे टाळतात. पण यावेळी मात्र त्यांनी थेट मोदींनाच अंगावर घेतले आहे.
Gujarat Assembly Election 2022 : केजरीवालांचा ‘तो’ दावा भाजपने फेटाळला
दरम्यान, दिल्लीतील तीन महापालिकांचे एकत्रिकरण करून या तीन महापालिकांची एकच महापालिका स्थापन करण्यात आली आहे. या एकत्रित महापालिकेच्या एकूण 250 जागा असून त्यासाठी 4 डिसेंबरला मतदान होणार असून 7 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.