नवी दिल्ली – गुजरात निवडणुकीतून माघार घेतली तर आम आदमी पक्षाचे मंत्री मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असलेली कारवाई थांबवू अशी ऑफर भारतीय जनता पार्टीने आपल्याला दिली होती असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी एका वाहिनीच्या कार्यक्रमात केला होता. मात्र त्यांचे बोलणे सपशेल खोटे असल्याचे नमूद करत भाजपने हा दावा फेटाळला आहे.
भाजपचे प्रवक्ते सईद जाफर इस्लाम म्हणाले की, केजरीवालांचा हा खोटा दावा केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी आहे. त्यांनी केवळ दिल्लीच नाही तर देशाच्या जनतेची दिशाभूल केली आहे. त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी अण्णा हजारे यांचा उपयोग करून घेतला आणि नंतर त्यांना सोडले. सत्ता बळकावण्यासाठी ते कोणालाही फसवू शकतात.
Gujarat Election Date 2022 : गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक; 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान
दरम्यान, नुकतीच गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार आहे. १ आणि ५ डिसेंबरला गुजरात निवडणुक पार पडणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गुजरातमध्ये ४.९ करोड मतदान होणार आहे. महिलांसाठी १२७४ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दिव्यांगासांठी खास १८२ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.
गुजरात निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिसूचना तारीख – 5 नोव्हेंबर (पहिला टप्पा) आणि १0 नोव्हेंबर (दुसरा टप्पा)
नामांकन तारीख – १४ नोव्हेंबर (पहिला टप्पा), १७ नोव्हेंबर (दुसरा टप्पा)
नामांकनाची छाननी तारीख – १५ नोव्हेंबर (पहिला टप्पा), १८ नोव्हेंबर (दुसरा टप्पा)
उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख- १७ नोव्हेंबर (पहिला टप्पा), २१ नोव्हेंबर (दुसरा टप्पा)
निवडणुकीची तारीख-
पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला मतदान
दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे
गुजरात निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला लागणार आहे
१0 डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण