लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) चीनच्या कथित अतिक्रमणाबद्दल कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी शुक्रवारी सांगितले की, लडाखी असं म्हणत आहेत की चीनने आमची जमीन घेतली आहे. पंतप्रधान सांगत आहेत की कुणालाही आमची जमीन मिळाली नाही. साहजिकच कोणीतरी खोटे बोलत आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यात बरेच लोक असे म्हणत आहेत की चिनी सैनिक आमच्या हद्दीत घुसले आहेत. एखादी व्यक्ती असे म्हणत आहे की चीनी सैनिक गलवान भागात 15 किमी आत घुसले आहेत. लोक म्हणतात की आमच्या भूमीवर चीनचा व्याप वाढत आहे.
Ladakhis say:
China took our land.PM says:
Nobody took our land.Obviously, someone is lying. pic.twitter.com/kWNQQhjlY7
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 3, 2020
भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेहच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी तेथील वास्तवाचा आढावा घेतला आणि सैन्याला प्रोत्साहन दिले. पंतप्रधान मोदींच्या लेह दौर्यादरम्यान राहुल गांधींनी व्हिडिओ शेयर करून प्रश्न उपस्थित केला आहे. त्यात त्यांनी विचारले कि, नेमके कोण खोटे बोलत आहे?