मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल, बबिता आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गोकूलधाम नावाच्या एका सोसायटीमध्ये घडणाऱ्या गंमती जंमती या मालिकेमध्ये दाखवल्या जातात.
‘दरम्यान, या मालिकेतील बबिता उर्फ अभिनेत्री ‘मुनमुन दत्ता’ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपले फोटो, व्हिडिओ मुनमुन सतत चाहत्यांशी शेअर करते. फॅन्स देखील तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा तुफान वर्षाव करतात. नुकतंच मुनमुनने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंवरुन टप्पू उर्फ अभिनेता ‘राज अनादकट’ने तिची खिल्ली उडवली आहे.
View this post on Instagram
मुनमुनने लाल रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले. या फोटोंमध्ये तिच्या हातात चहाचा कप दिसत आहे. ‘हा कप रिकामा आहे…’ अशी गंमतीशीर कॉमेंट या फोटोखाली राजने केली. यावर मुनमुन म्हणाली, ‘तुला कसं माहिती?’ तिच्या या कॉमेंटवर राज म्हणाला… ‘मी देखील असेच फोटो काढतो.’ सध्या त्यांची ही अनोखी जुगलबंदी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.