मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तिघांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान, आज या सरकारची अग्निपरिक्षा असून त्यासाठी सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे. यासर्व घडामोडीत महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Balasaheb Thorat,Congress: Nana Patole will be the Congress candidate for Speaker elections. #Maharashtra pic.twitter.com/oqaH1VjZVW
— ANI (@ANI) November 30, 2019
कॉंग्रेसचे विधिमंडळाचे गटनेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच मिळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.