मुंबई – बॉलीवुडचा अॅक्शन, स्टंट स्टार विद्युत जामवाल आणि अभिनेत्री अदा शर्मा यांचा “कमांडो 3′ २९ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. एक्शन सीक्वेंस आणि देशभक्तीवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉम वेबसाईटच्या माहितीनुसार, बॉक्स ऑफिसवर “कमांडो 3′ ने पहिल्या दिवशी 20% कमाई केली आहे.
दरम्यान ट्रेंड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटद्वारे या चित्रपटसमीक्षण केले आहे. तत्पूर्वी, विद्युतने या चित्रपटातील एन्ट्री सीन आपल्या इन्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या एन्ट्री सीन व्हिडिओला शेअर करत लिहिले की होते की,’यह तो शुरूवात है, २९ नोव्हेंबर को देखो होता है क्या?’ या एन्ट्री सीनमध्ये विद्युत जमवाल अगदी बॉलिवूड फिल्मी स्टाईलने फायटिंग करताना दिसतो. सध्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आदित्य दत्तनी डायरेक्शन केलेल्या या सिनेमामध्ये अदह शर्मा, अंगीरा धर आणि गुलशन देवैय्याह हे देखील असणार आहेत.